गडहिंग्लज, ता. १९ : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महादेव आप्पा शिंदे यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. अत्याळ गावातील हे ३२ वे तर चळवळीतील ८४ वे नेत्रदान ठरले. दहा वर्षांपूर्वी अत्याळ गावातून मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा प्रारंभ झाला. सुरवातीच्या टप्प्यात नेत्रदानाची तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यात महादेव शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळत होते. चळवळीच्या कामातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. दरम्यान, रविवारी (ता.१८) दुपारी महादेव शिंदे यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शिंदे कुटुंबीयांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. शिंदे यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. बुधवारी (ता.२१) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे.
--------------------------------
श्री. अवधूत पाटील