मेक्सिकोत बारमध्ये अंदांधुंद गोळीबार, नऊ जण ठार

KolhapurLive

मेक्सिकोत बारमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले आहेत. सेंट्रल मेक्सिकोधील Guanajuato मध्ये हा गोळीबार झाला असून, यात दोघे जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गटांमधील हिंसाचारात वाढ झाली असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वाजता एक गट हातात बंदुका घेऊन बारमध्ये घुसला होता. यावेळी त्यांनी बारमध्ये असणाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या गोळीबारात पाच पुरुष आणि चार महिला ठार झाल्या. एक महिला जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.
हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस आणि प्रशासन याप्रकरणी तपास करत असून त्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी गुन्हेगारी गट असल्याचा संकेत देणारी दोन पोस्टर्स आढळली असल्याचं काहींनी सांगितलं आहे.