गावागावातील विकास कामे करुन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार प्रकाश आबिटकर

KolhapurLive


गारगोटी प्रतिनिधी, 
विविध भागाचा विकास करण्यासाठी आणि शासनाकडून विकास कामे खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे दूरदृष्टी असावी लागते. ती असल्यास नक्कीच विकासाला गती मिळते. गावागावातील विकास कामे करून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कठिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. 

ते आंबवणे, (ता.भुदरगड) येथील विविध फंडातून मंजूर झालेल्या 1 कोटी 50 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकर्पण समारंभ बोलत होते. यावेळी युवानेते विरेंद्र मंडलिक प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील हावभाव व मात भगिनींनी घरोघरी केलेले औक्षणाने मी भारावून गेलो आहे. या गावातील आपुलकी आणि प्रेम पहाता या गावामध्ये केलेली विकासकामे सत्कारणी लागली आहेत. यापुढेही या गावातील विकास कामांसाठी निधी कधीच कमी पडू देणार नाही. 

गावातील पुढील विकास कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आंबवणे फाटा ते आंबवणे गाव रस्ता 1 कोटी 32 लाख, पाझर तलावाकडे जाणारा रस्ता 10 लाख, हायमास्ट 2 दिवे 3 लाख, मोरे गल्ली काँक्रीटीकरण 2 लाख, सार्वजनिक शौचालय 3 लाख आदी कामांचा समावेश आहे.

यावेळी गोकूळ संचालक नंदकुमार ढेंगे, माजी सभापती बाबा नांदेकर, जि.प.सदस्य रोहिणी आबिटकर, माजी सभापती सुनिलराव निंबाळकर, स्नेहल परीट, बाळासाहेब भोपळे, बाजीराव चव्हाण, सर्जेराव मोरे, आंबवणे सरपंच रोहित जोशी, उपसरपंच शितल घरपणकर, प्रदिप वारके, अमोल जोशी, पोलीस पाटील, दिलीप सावर्डेकर, पी.ए.जोशी, सागर चव्हाण, वसंत सिधू नले, डी.एस.निकम, एन.बी.चव्हाण, शहाजी घरपणकर, महादेव जोशी, एम.एस.भाडवले, कृष्णात निकम, बाळसो मगदूम, आरेकर सर, बाबासो कांबळे, पाडूरंग सुतार, विक्रम चव्हाण, साटपे सर, साताप्पा मारे, सुनिल सांवत, एस.बी.जोशी, कुंडलिक जोशी, दिनकर घरपरकर, रघुनाथ सावंत, अनिल चव्हाण, शामराव जोशी, विजय सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : विकास कामांचा शुभारंभ करताना विरेंद्र मंडलिक उपस्थित आमदार प्रकाश आबिटकर, नंदकुमार ढेंगे, बाबा नांदेकर, रोहिणी आबिटकर, सरपंच रोहित जोशी आदी मान्यवर