चंदगड : लंपीच्या साथीमुळे जिल्ह्यात जनावरांच्या बाजार बंद असताना आणि जनावर वाहतुकीस अधिकाऱ्यांनी बंदी घातलेल्या असताना सुद्धा कतली साठी वाहतूक होत असलेल्या दोन बैल व दोन म्हशीसह बोलेरो पिकअप व्हॅन पाटणे फाटा चौक चांदगड पोलिसांनी पकडून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गाडीसह जनावरांची किंमत २ लाख ५८ हजार रुपये आहे. शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाटणे फाटा चौकात पोलीस नाकाबंदी असताना बुलेरो पिकअप व्हॅन मध्ये दोन बैल आणि दोन म्हशी निदर्शनास आल्या. ही चारीही जनावरे व्हॅनच्या होघात बांधलेली होती. गाडीचालकाकडे जनावर वाहतुकाचा परवाना नव्हता. चौकशी अंती गाडीतील जनावरे कतलीसाठी जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बोलेरेतून दोन बैल एक मुरा जातीची म्हैस आणि एक छोटी म्हैस अशी ५८ हजाराची जनावरे घेऊन जाणाऱ्या किटवाड (ता. चंदगड) येथील नागोजी भरमू नरेवाडकर आणि अनिल शंकर लाड यांच्याव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाहनासह २ लाख ५८ हजारची मुद्देमाल जप्त केली. पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांच्या फर्यादीवरून गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस नाईक पाटील करत आहेत.