कोविड नंतर जाधेवाडी गडहिंग्लज एस टी बस सेवा पूर्ववत

KolhapurLive

जाधेवाडी तालुका आजरा या गावांमध्ये जाधेवाडी गडहिंग्लज एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.
शुक्रवार दिनांक11 नोव्हेंबर 2022 रोजी जाधेवाडी गावामध्ये पूर्ववत सुरू झालेल्या एसटी बसचे उद्घाटन जाधेवाडी गावच्या सरपंच सौ.अश्विनी शिंदे व उपसरपंच रघुनाथ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनासाठी  ग्रामपंचायत सदस्य श्री बबन सावंत श्री.रघुनाथ शिंदे ,सौ.पबीता सावंत,सौ वंदना भुजंग सौ सुजाता सावंत तसेच जाधेवाडी गावचे पोलीस पाटील श्री जयवंत मांगले, माजी पोलीस पाटील श्री गणपती सावंत तसेच श्री.पांडुरंग रावण,श्री प्रभाकर सावंत श्री मारुती हारेकर,श्री.बाबुराव सावंत,श्री.अशोक गेंगे, श्री.रमेश भुजंग,श्री.पांडुरंग मांगले,श्री.विश्वास करडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

 ही बस सेवा  कागल चे आमदार माननीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या प्रयत्नातून तसेच न्यू इंग्लिश स्कूल कौलगे स्टाफने  वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच गडिंग्लज आगार प्रमुख श्री चव्हाण साहेब यांच्या सहकार्यातून पूर्ववत सुरू झाली

 एसटी बस सेवा सुरू झाल्यामुळे जाधेवाडीतील शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच गावातील वृद्ध पुरुष महिला यांना प्रवास करण्यासाठी लाभ मिळणार आहे