काय म्हणाले संदीप देशपांडे?
“राहुल गांधींकडून ज्या पद्धतीने स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न होतो आहे. हे कोणाला न पटण्यासारखं आहे. हे कुठं तरी थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे उद्या राज्यभरातून मनसैनिक हे शेगाव येथे पोहोचणार आहेत. यावेळी त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचा निषेध नोंदवू. मनसेची निषेध नोंदवण्याची एक पद्धत आहे. यावेळी केवळ काळे झेंडे आम्ही दाखवणार नाही,आमचा निषेध कसा असतो, हे उद्या शेगावमध्ये सर्वांना बघायला मिळेल”, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
“आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. मात्र, तुम्ही तोंडावर ताबा ठेवणार नसाला, तर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही महाराष्ट्रात येता आणि आमच्या महापुरुषांबाबत वाटेल तो बोलता, हे आम्ही सहन करणार नाही. तुम्ही अशाप्रकार सावरकरांचा अपमान करणार असाल, तर निश्चितपणे तुम्हाला धडा शिकवला जाईल”, असेही ते म्हणाले.