कागल : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेच्या लाभार्थीना शासनातर्फे दरमहा एक हजार रुपये पेन्शनमध्ये वाढ करून ती दोन हजार रुपये करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाअध्यक्ष सामरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली.
निवेदनात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना लाभार्थींची उत्पन्न मर्यादा २१ हजाराहून ५० हजार करावी, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना दारिद्र्य रेषेखालील कमावत्या व्यक्तीची मृत्यू झाल्यास वारसास मिळणारा वीस हजार रक्कम 30 हजार रुपये करावी. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणाऱ्या मासिक वेतन अर्थसाहाय्यत वाढ करण्यात यावी आदी मागण्यांचीही यामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून या प्रश्नात तातडीने लक्ष घालून मागण्या पूर्ण कराव्यात, अशी विनंती केली.