गडहिंग्लजमधील श्री. दत्त मंदिर भाविकांचे श्रद्धा केंद्र बनेल पालकमंत्री हसन मुश्रीफ

KolhapurLive

युनिव्हर्सल दगडूशेठ मंडळाच्या श्री दत्त मंदिराचा जीर्णोद्धार प्रारंभ
             
गडहिंग्लज, दि. ६:
गडहिंग्लजमध्ये होत असलेले श्री दत्त मंदिर भाविकभक्तांचे श्रद्धाकेंद्र बनेल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 
            
नेहरू चौकातील युनिव्हर्सल दगडूशेठ गणेश मंडळाच्या श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार, युनिव्हर्सल दगडूशेठ गणेश मंदिर व ध्यान मंदिराचा भूमिपूजन व पाया खुदाई पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उद्योजक सुरेश कोळकी होते. २१० वर्षांपूर्वीचे प्राचीन श्री. दत्त मंदिर श्री टेंबे स्वामी महाराज- मानगाव यांच्या पवित्र हसते स्थापन झाले होते. कै. अनंत कल्लो जोशी यांनी या मंदिराची तहहयात सेवा केली.
                     
भाषणात मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, युनिव्हर्सल फ्रेंड सर्कलच्या तरुणांचे विधायक काम कौतुकास्पद आहे. मंदिराचे काम हाती घेऊन फार मोठा विडा उचलला आहे. मंडळाची कार्यपद्धती व त्यांचे उपक्रम हे वाखाणण्याजोगे आहेत. एक चांगल्या संस्काराचा वसा हे मंडळ समाजात रुजवत आहे. त्यामुळे; हे मंदिर सर्वात सुंदर होणार आणि त्यासाठी माझ्यापरीने त्यांना सर्व प्रकारचे लागेल ते सहकार्य करू.
               
अध्यक्षस्थानावरून बोलताना सुरेशआण्णा कोळकी म्हणाले, या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते सतत काहीतरी नवीन करून दाखवण्यासाठी धडपडत असतात. तळमळीने काम करत असतात. युनिव्हर्सल मंडळांमध्ये अनेक स्पर्धा, गडहिंग्लज महोत्सव, मिस गडहिंग्लज, रक्तदान शिबिर ,पर्यावरण जागृतीसाठी सायकल रॅली , वृक्षारोपण तसेच चांगले सामाजिक उपक्रम यांनी राबवले. 
              
गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील यांचेही भाषण झाले.
                 
प्रास्ताविकपर भाषणात श्रीनिवास वेर्णेकर यांनी, मंडळाचा २८ वर्षाचा इतिहास व भविष्यातील सामाजिक योजना मांडल्या.
            
कार्यक्रमापूर्वी श्री दत्त महिला भजनी मंडळाने भजन कार्यक्रम सादर केला. तसेच; हळदीकुंकू समारंभही उत्साहात पार पडला. भालचंद्र सौंदलगेकर- निपाणी, बसवराज तुरबठमठ, गजानन जोशी, अविनाश पुराणिक आणि इतर मान्यवरांचा सत्कार झाला.
             
या समारंभाला माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, स्वाती कोरी, बसवराज खणगावे, उदय जोशी, रमेश रिंगणे, नरेंद्र भद्रापुरे, किसन कुराडे, नागेश चौगुले, हरुण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, रियाजभाई शमनजी, उदय परीट,वसंतराव यमगेकर, राजेंद्र तारळे, अमर मांगले, महेश सलवादे , रेश्मा कांबळे, संतोष चिकोडे, जे. बी. बारदेसकर, राहुल शिरकोळे, प्रीतम कापसे, दिग्विजय कुराडे हे मान्यवर, मंडळातील सर्व महिला व पुरुष सभासद उपस्थित होते.
              
स्वागत संदीप मिसाळ यांनी केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक पोतदार यांनी आभार मानले.

           
गडहिंग्लज: श्री देव दत्तात्रय मंदिराचा जीर्णोद्धार प्रारंभ, ध्यान मंदिराचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
================