नूलला एप्रिलमध्ये यात्रेसह हनुमान मंदिराचे कळसारोहण

KolhapurLive

नूल, ता. १९ नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराचा कळसारोहण समारंभ, यात्रा व चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींची जयंती असा कार्यक्रम एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्याचा निर्णय यात्रा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सुरगीश्वर मठात मठाधिपती गुरुसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखालील यात्रा समिती व प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाली. या वेळी ३० मार्च ते ९ एप्रिल हनुमान मंदिरात महारुद्राभिषेक, ५ एप्रिल रोजी श्री चंद्रज्योती पदयात्रा, ६ एप्रिल रोजी लिंगैक्य चंद्रशेखर स्वामीजींची जयंती व धर्मसभा, ७ एप्रिल रोजी मूर्ती व कलश मिरवणूक, ८ एप्रिल रोजी शिखरावर मूर्ती प्रतिष्ठापना, ९ एप्रिल रोजी जगदगुरूंच्या अमृतहस्ते कळसारोहण, १० एप्रिल रोजी गंगापूजन, ११ एप्रिल रोजी आंबील गाडी मिरवणुक, महाप्रसाद व १२ एप्रिल रोजी विविध स्पर्धा, कुस्ती मैदान, असे कार्यक्रम घेण्याचे ठरले. बैठकीस यात्रा समिती, सुरगीश्वर सेवा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.