पत्र्याच्या शेडमधील एटीएम सेंटर बंद करा : कुट्रे

KolhapurLive

चंदगड : तालुक्यात काही ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये एटीएम सेंटर सुरू करण्यात आले आहेत .पक्के बांधकाम असल्याशिवाय अशा सेंटरना वीज कनेक्शन देऊ नये,नियम असताना महावितरण कंपनीने तिथे कनेक्शन दिले.या संदर्भात महावितरण कंपन्यांकडे पाठपुरवठा करून हे दुर्लक्ष आहे. अशा प्रकारे दिलेले कलेक्शन ग्राहकांच्या जीवावर बेतणारी असल्याने ती बंद करावी अन्यथा आंदोलन छेडू ,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश कुर्टे यांनी दिले आहे. तालुक्यात अडकुर पटणे अडकुर पाटणे फाटा आदी महत्त्वाचे बाजारपेठमध्ये एटीएम सेंटर सुरू करण्यात आले आहेत.पक्के बांधकाम असलेल्या इमारती तेच अशी सेंटर सुरू करावी, असा शासनाच्या नियम आहे.मात्र, तो डावलून ही सेंटर सुरू करण्यात आल्याच कुट्रे यांचा आरोप आहे.काही दिवसांपूर्वी महावितरणा'च्या बेपवाईमुळे बुक्कीहाळ येथे एका  तरुणाचा जीव गेला.अशीच दुर्घटना या सेंटरमधून घडू  घडू शकते. शासनाने अशा प्रकारे मृत्यूचे सापळे तयार केले आहेत का ? असा प्रश्नही कुटे यांनी यांनी विचारला आहे. दरम्यान, याबाबत 'महावितरण' चे अभियंता विशाल लोधी म्हणाले ,की कोणत्याही ग्राहकांची वीज कनेक्शन पासून वंचित ठेवू नये, असा महावितरण चा नियम आहे. या त्यानुसार मागणी केलेल्या ग्राहकांला कनेक्शन दिले आहे.