पुणे : पक्षीय राजकारण आणि मानापमान नाट्याने गाजलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या निवडणुकीची नववी फेरी सुरू असून पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांनी साडेचार हजार मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासूनच दीड हजार मतांच्यावर आघाडी घेऊन धंगेकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला तब्बल 30 वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढत आहेत.
आठव्या फेरीत मतांची बेगमी
कसब्यातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनीही उडी घेतली होती. मात्र, दवे यांना आठव्या फेरी अखेर केवळ 100 मते मिळाली आहे. धंगेकर यांना आठव्या फेरीत 30 हजार 527 मते मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांनना 27 हजार 187 मते मिळाली आहेत. धंगेकरांनी 3500 मते घेऊन आघाडी केली आहे.
सातव्या फेरीत काय घडलं?
सातव्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 25 हजार 904 मते मिळाली आहेत. हेमंत रासने यांना 24 हजार 633 मते मिळाली होती. धंगेकर अवघ्या 1 हजार 271 मतांनी आघाडीवर आहे. सहाव्या फेरीत धंगेकर यांना 23 हजार 80 मते मिळाली होती. रासने यांना 20 हजार 363 मते मिळाली होती. तर आनंद दवे यांना 100 मते मिळाली होती. धंगेकर हे 2 हजार 717 मते घेऊन आघाडीवर होते. पाचव्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना 19 हजार 645 मते मिळाली. तर रासने यांना 16 हजार 423 मते मिळाली. धंगेकर हे 3 हजार 222 मतांना आघाडीवर होते.
चौथ्या फेरीत रासने आघाडीवर
चौथ्या फेरीत धंगेकर यांना 3130 तर रासने यांना 3509 यांना मते मिळाली. या फेरीत रासने यांनी 600 मतांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांची आघाडी कमी झाली होती. रवींद्र धंगेकर यांना 11,157 मतं मिळाली होती. हेमंत रासने यांना 10,673 मतं मिळाली होती. रासने यांनी तिसऱ्या फेरीअखेर धंगेकरांची आघाडी कमी केली. तिसऱ्या फेरीत धंगेकर जवळपास 500 मतांनी आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीनंतर रासने पिछाडीवरच गेले.