चंदगड : येथे कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर या प्राथमिक शाळा एकाच ठिकाणी आहेत. तिथे मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यांच्याकडूनच खिडकीच्या काचा फोडल्या जात असाव्यात, असा नागरिकांचा कयास आहे.
गेल्या दोन महिन्यात सातत्याने कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिराच्या खिडक्यांच्या काचा अज्ञात व्यक्तीकडून फोडल्या जात आहेत.यासंबंधी केंद्रप्रमुख यांनी गटशिक्षणअधिकाऱ्यांना कळविले आहे सीसीटीव्ही शाळेच्या आवारात कार्यरत केल्याशिवाय खरे गुन्हेगार सापडणार नाहीत, ही वस्तूस्थिती असली तरीही कोणीही शाळेकडे वक्रदृष्टी दाखवू नये. शाळा हे ज्ञानमंदिर आपण समजतो त्या ज्ञानमंदिराची जोपासना सर्वांनी मनोभावे करण्याची गरज आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते मात्र गेल्या यांनी काही दिवसापासून जाणीवपूर्वक शाळा इमारतीचे नुकसान करण्याचे सत्र सुरू आहे सीसीटीव्ही बघितल्यास गुन्हेगार सापडतील. मात्र त्याआधी या परिसरातील उघड्या मैदानात मध्यपीचा वाढलेला वावर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत.त्यांनी गस्त घालून गुन्हेगारांना जेरबंद करावे. अशी मागणी चंदगड शहरातील नागरिकांकडून होत आहे चंदगड ग्रामपंचायतीने शाळेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा देऊन सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी ही मागणी शिक्षक वर्ग, नागरिकांकडून होत आहे.