*कागल, दि. २१:*
*कागल शहरातील शाहू कॉलनी येथील श्री. सखाराम गणपती निकम व श्री. सतीश सखाराम निकम यानी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयाबाबा माने व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.*
*यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, कागल पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर, माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील, माजी नगरसेवक सुनील कदम, अर्जुन नाईक, ॲड. संग्राम गुरव, महेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.*