क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या परीक्षेला प्रतिसाद

KolhapurLive


गडहिंग्लज, ता. १४ : येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून (सन २०२३-२४) क्रिएटिव्ह ब्रिलियंट ॲकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲकॅडमीमार्फत परीक्षा घेण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 
 
गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातून २४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत सोहम शेंडगे, सोहम चव्हाण, तन्वी सावंत, यांनी अनुक्रमे पहिले  तीन क्रमांक पटकाविले. त्यांना शैक्षणिक शुल्कात दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच,  पहिल्या दहा क्रमांकांची उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव अण्णासाहेब बेळगुद्री यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला‌. मुख्याध्यापक दिनकर रायकर, पूजा घोरपडे, विनायक माने, अंकुर गौरूले, समीर बिरंबोळे आदी उपस्थित होते.