मुंबई : तामिळ, हिंदी चित्रपटसृष्टीत ५०-६० च्या दशकांत विविधांगी भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे हैदराबादमध्ये निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने जमुना यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘मिस मेरी’, ‘बेटी बेटे’, ‘मिलन’, ‘दुल्हन’, ‘एक राज’, ‘रिश्ते नाते’ हे त्यांचे गाजलेले हिंदी चित्रपट. प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्री जमुना यांनी दाक्षिणात्य निर्मिती संस्थांनी तयार केलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या होत्या. जमुना यांना ‘मिलन’ या चित्रपटासाठी १९६८ साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रींचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता.