भादवण - मौजे मासेवाडी ता.आजरा येथे विधुत उप केंद्रिस गेली तिन वर्षा मागे शासकीय मंजुरी मिळाली असुन त्यासाठी मासेवाडी येथे जागा पण मिळाली आहे पण त्या साठी शासकीय निधी मिळत नसले मुळे विधुत केंद्र उभारणेस अडचण येत आहे
भादवण पंचक्रोशी ही आजरा सब डीव्हीजन केंद्रापासून 20 ते 25 किलो मिटर वरती शेवटचा भाग आहे त्यामुळे या भागात नेहमी कमी दाबाचा विधुत पुरवठा मिळत असतो त्यामुळे या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना उद्योजकांना व ग्रामस्थांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे
कमी दाबाचा विधुत पुरवठा असलेमुळे उद्योगांना चालना मिळत नसुन उद्योग डबघाईस आले आहेत नविन विज कनेक्शन कींवा वाढीव लोड (Hp)ची मागणी केलेस मागणी प्रमाणे विज मिळत नाही तरी या साठी अत्यंत गरजेची बाब म्हणून तातडीच्या योजनेतून फंड उपलब्ध करुन या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना या संकटातून बाहेर काढावे ही नम्र विनंती असे ह्या निवेदनात म्हटले आहे