गडिंग्लज : नगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांअंतर्गत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ५ महिला बचत गटांना १ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्जाची वाटप करण्यात आली.
कार्यालयीन अधीक्षक भारती पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शहरातील पाच महिला बचत गटाला कर्ज मंजुरी पत्र आणि धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी अधीक्षक भारती पाटील म्हणाल्या, महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी ' डे न्यूएम ' योजनेतून कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मिळत असल्याने महिला बचत गटाच्या माध्यमातून यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. रवीनंदन जाधव यांनी महिला बचत गटाकरिता त्यांच्या तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी सहकार्य करणार असून कापडी पिशव्याबाबत मार्गदर्शन केले. तर पालिकेत बसवण्यात आलेले वेंडिंग मशीन बाबत डेमो देत पाच रुपयात नागरिकांना कापडी पिशवी उपलब्ध करून दिल्या असून त्यांचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. यावेळी प्रकल्प अधिकारी जयवंत वरपे, समुदाय संघटना संदीपकुमार कुपटे यांनी योजनेबाबत माहिती देत महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्य अधिकारी स्वरूप खरगे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सीपीआर विद्या कांबळे, मीनाक्षी मोळदी यांच्यासह विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होत.
✳️ *कोल्हापूर LIVE* ✳️
*गडहिंग्लज-चंदगड-आजरा-राधानगरी-कागल तालुक्यातील बातम्यांसाठी आजच आमचा 9766784500 मोबाईल क्रमांक आपल्या whasapp ग्रुपवर ऍड करा*
*जाहिरात-सुर्या सांस्कृतिक भवन-शुभकार्य तुमचे,कार्यपूर्ती आमची !*
*केक & डोनट-अल्पवधीतच सर्वांच्या पसंदीस आलेले केक व इतर बेकरीचे दालन*
✳️ *सत्याचे प्रतिबिंब* ✳️