गडहिंग्लज, ता. २९ : येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयातील स्वस्थवृत्त व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त १०८ सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण केला. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. ओंकार प्रतिमेचे पूजन योगशिक्षक तानाजी डोंगरे यांच्या हस्ते झाला.
१०८ सूर्यनमस्कार ५५ मिनिटात पूर्ण केले. डॉ. सोनाली शुक्ल यांनी सूर्यनमस्कार पूर्ण केलेल्या साधकांचे अभिनंदन केले. विद्यार्थिनी प्रतिनिधी माधुरी गडदरे यांनी आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष अंजना रेडेकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव सुनील शिंत्रे, प्राचार्य डॉ. वीणा कंठी, उपप्राचार्य डॉ. पंकज विश्वकर्मा, डॉ. विराज शुक्ल, डॉ. सपना बसर्गे, अशोक शिंदे, निरंजन मठपती, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषीकेश काकडे, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.