गडहिंग्लज , ता.१० : सीमाभागातील लोकांशी गडहिंग्लजचे एक वेगळे नाते आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आशा वेळी तत्त्वज्ञान बोलून उपयोग होत नाही. ते अंगावर आलेत. आपण आता षंढासारखे गप्प बसून चालणार नाही, असे स्पष्ट मत माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील महालक्ष्मी मंदिरात सीमाप्रश्नावर अनुषंगाने सर्व पक्ष बैठक झाली या प्रसंगी ॲड. शिंदे बोलत होते प्रा. किसनराव कुराडे म्हणाले , "सीमा प्रश्न राजकीय नाही तो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडवायला हवा. त्यासाठी व्यापक भाषाविषयक धोरण आखावे लागेल ."
स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्डयान्नावर म्हणाले.' निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन राज्यातील बांधवत वाद निर्माण केला जात आहे. केंद्राने यात हस्तक्षेप करावा. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाअध्यक्ष दिलीप माने, नागेश चौगुले, दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, अंनिसचे प्रा.प्रकाश भोईटे यांचीही भाषणे झाली.
मंगळवारी मोर्चा
सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दर्शवण्यासाठी मंगळवारी (ता. १३ ) मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत झाला.