चंदगडच्या गिरणी कामगारांचा १८ जानेवारीला मुंबईत मोर्चा

KolhapurLive


चंदगड, ता.२९ : मुंबईत गिरणीत काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या हक्काचे घर तसेच पुनर्वसनाच्या प्रश्नावर जाब विचारण्यासाठी १८ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व श्रमिक संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन केले. संघटनेचे अतुल दिघे, दत्तात्रय अत्याळकर यांनी ही माहिती  दिली.

मुंबईतील गिरणी उद्योग जाणीवपूर्वक बंद केल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे गिरण्यांची मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली जागा बिल्डरांच्या ताब्यात गेली. गिरण्या बंद झाल्याने देशोधडीला लागलेल्या कामगारांना गिरणींच्या मोकळ्या जागेत घर आणि पुनर्वसनाचा मुद्दा घेऊन संघटनेने लढा उभारला. त्याचा परिणाम म्हणून कामगारांची नोंदणी केली गेली. एक लाख ७४ हजार कामगार आणि वारसदारांची नोंद झाली. काही कामगारांना किंवा  वारसांना प्रत्यक्ष घराचा ताबा मिळाला. परंतु  शासनाच्या बेफीकर वृत्तीमुळे अजूनही मोठ्या प्रमाणात कामगांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेले नाही. यासंदर्भात शासनाने ठोस धोरण जाहीर करणे गरजेचे आहे. यासाठी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी लढ्यात सहभागी व्हावे.

सरकारने कृती करानी यासाठी भाग पाडायला हवे. हाच उद्देश  ठेवून  १८ जानेवारीला चेतावती मोर्चा काढण्यात येत आहे. या दिवशी राज्यातील सर्व कामगार  महाराष्ट्री हायस्कूलच्या  मैदानावर  एकत्र येतील. येथून मोर्चाने मुख्यमंत्राी निवासस्थानाकडे कुच करतील. लढ्याच्या  तयारीसाठी  तालुकावार बैठका घेऊन  मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुंबईसह कोकण, कोल्हापूर,  सातारा , सांगली , पुणे येथील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी सहभागी होऊन लढा यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.