चंदगड : तालुक्यात शेती पंप व घरगुती वीज ग्राहकांची विनारीडिंग लागू केलेली वीज बिले दुरुस्त करून मिळावी तोपर्यंत कनेक्शन तोडले जाऊ नये , अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरणकडे निवेदनाद्वारे केली. कंपनीने शेतीपंपाची तसेच घरगुती वीज ग्राहकांची बहुतांश बिले रीडिंग न घेता दिली आहेत. विजेचा वापर कमी आणि बिल जास्त अशी परिस्थिती आहे. याबाबत ग्राहकातून तीव्र नाराजीचा सूर आहे. याबाबत कंपनीने योग्य मीटर रीडिंग घेऊन बिलामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तोपर्यंत बिले भरले नाही म्हणून कनेक्शन तोडले जाऊ नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर पिंटू गुरव, मंगेश खामकर, महादेव पाटील, विकास वाईंगडे, संजय सुतार, संजय नाईक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.