गडहिंग्लज शहरामध्ये घेणार भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर......
कागल : आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दि.1 डिसेंबर पासून गडहिंग्लज शहर येथे हे प्रशिक्षण सुरू होणार आहे. दि. 30 नोहेंबर पर्यंत कालावधीत इच्छुक उमेदवारांनी फाउंडेशनकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले आहे. कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, साधारणता एक महिनाभराहून अधिक काळ चालणाऱ्या अनिवासी स्वरूपाच्या या प्रशिक्षणामध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व वैद्यकीय परीक्षा यासंबंधीची तयारी काटेकोरपणे करून घेतली जाणार आहे. आजअखेर आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या नोकरीच्या भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या आयोजन केले होते. त्या अंतर्गत पोलीस दलामध्ये तीनशेहून अधिक, एसटीमध्ये सहाशेहून अधिक, सैन्य दलात व सीमा सुरक्षा दलांमध्ये तीनशेहून अधिक जणांची भरती झाली आहे.
नाव नोंदणीसाठी पत्ता व संपर्क क्रमांक असा,
कागल तालुक्यातील उमेदवारांसाठी: आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन, भुयेकर पेट्रोल पंपासमोर, एस. टी. स्टँडजवळ - कागल. फोन ०२३२५ २४५२४४. गडहिंग्लज शहरासह कडगाव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघ व उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ: आमदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन, डी. एम. प्लाझा, नवीन कोर्टासमोर, चर्च रोड- गडहिंग्लज. फोन ९५६१०९१४६२