आजरा येथील रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडे दीपावली पाडवा निमित्त तीस लाखांच्या ठेवी जमा झाल्या असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा फडके, उपाध्यक्ष किरण कांबळे यांनी दिली.
श्री कांबळे म्हणाले, ग्रामीण भागात असलेल्या रवळनाथ पतसंस्थेवर आजही सभासद ठेवीदार हितचिंतकाच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवले आहेत. दीपावली पाडव्यानिमित्त एका दिवशी तीस लाखांच्या ठेवी जमा झाल्या. सध्या बँकेकडे दहा कोटींवर ठेवी असून सात कोटींवर कर्ज वाटप केले असल्याचे सांगितले. यावेळी सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.