उत्तुर येथे आज सहावे त्रिवेणी साहित्य संमेलन

KolhapurLive


उत्तुर - सहावे त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी, २७ रोजी उत्तुर येथे होत आहे.  महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई व उत्तुर येथील त्रिवेणी संस्कृतिक,  शैक्षणिक व क्रीडा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . या पार्श्वभूमीवर येथे नेहरू चौकत बॅरिस्टर नाथ पै. साहित्यनगरीची उभारणी करण्यात आली आहे.
          
       रविवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या काळात हे संमेलन सुरू राहणार असून यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे . साहित्यक्षेत्रातील दिग्गज मंडळींचे विचार या संमेलनाच्या माध्यमातून साहित्यरसिकांना ऐकायला मिळणार आहे. सहा सत्रात होणाऱ्या या संमेलनात संस्कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहे . उत्तर आणि परिसरातील साहित्य रसिकांना पर्वणी ठरणाऱ्या या संमेलनात साहित्य रसिकांनी वेळेत उपस्थित राहावे , असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे संमेलन यशस्वी करण्यासाठी त्रिवेणी संस्थेची सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.