बुधवारी काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे डोळ्याला गंभीर दुखापत झालेले व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये नितीन राऊत यांना ही गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राऊत यांच्यावर हैदराबादमधील वासवी रुग्णालयात उपचारदेखील करण्यात आले. रुग्णालयातील त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत असून आता खुद्द नितीन राऊत यांनीच नेमकं काय घडलं होतं, याविषयीचा घटनाक्रम सांगितला आहे.
नितीन राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली. “भारत जोडो यात्रा जेव्हा सुरू झाली, तेव्हापासून मी त्या यात्रेत सहभागी झालो नव्हतो. मध्यंतरी मी आजारी असताना जाऊ शकलो नाही. नंतर थोडं बरं वाटल्यावर मला वाटलं तिथे जावं. त्यामुळे हैदराबादला यात्रेत सहभागी व्हायला मी गेलो होतो. विमानतळावर उतरल्यानंतर मी सरळ इंदिरा गांधींच्या पुतळ्याच्या ठिकाणी कार्यक्रमा होता, तिथे गेलो होतो”, अशी माहिती राऊत यांनी दिली.

मी कोपऱ्यात होतो. तरी मला छातीवर हात ठेवून स्वत: एसीपी आणि चार लोकांनी जोरात धक्का दिला. समोरून ढकलल्यामुळे मला डोक्यावर लागणार असं वाटत असतानाच मी स्वत:ला सावरलं. त्या प्रयत्नात मी उजव्या बाजूला रस्त्यावर पडलो. मला डोळ्याला जोरात मार लागला. तिथे रक्तस्राव सुरू झाला. २२ मिनिटं रक्तस्राव सुरू होता. पण कुणीही आलं नाही. पोलीसही आले नाहीत. कार्यकर्त्यांनी घेराव घातला”, असा दावा राऊत यांनी केला.