गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील उमानूर ते झिंगानूर परिसरात असून तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिरोंचा तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे हादरे बसले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरात होते. मात्र, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू उमानूर आणि झींगानूरमधील टेकडी परिसरात असल्याचा अंदाज आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्याने तेथेही काही ठिकाणी सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप प्रशासनाकडून अधिकृतपणे माहितीप्राप्त झालेली नाही. धरणक्षेत्रात भूकंपाचा धोका अधिक असतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर बांधण्यात आलेले धरण या भूकंपाला कारणीभूत आहे काय, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. काही वर्षांपूर्वीदेखील या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते, हे विशेष.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.