नथुराम गोडसेंच्या भूमिकेसाठी शरद पोंक्षे नव्हे तर ‘या’ मराठी अभिनेत्याला होती पहिली पसंती

KolhapurLive


     अभिनेते शरद पोंक्षे मराठी नाटक, मलिका, चित्रपट या माध्यमांमधून आपल्या भेटीस येत असतात. नुकतीच त्यांची ‘दार उघड बये’ दार ही मलिका सुरू झाली आहे. गेली अनेक वर्ष ते मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी अनेक भूमिका केल्या आहेत. मात्र त्यांची गाजलेली भूमिका म्हणजे ‘नथुराम गोडसे’ ही, या भूमिकेने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. १९८८ या नाटकाचे प्रयोग सुरु झाले होते. मात्र या भूमिकेसाठी एका वेगळ्या अभिनेत्याला पहिली पसंत होती.
     ‘मी नथुराम गोडसे’ या नाटकामुळे नाट्यसृष्टीत एक वादळ निर्माण झाले होते. नाटकाचे काही प्रयोग झाल्यानंतर या नाटकावर बंदी घालण्यात आली होती. नाटक कोर्टात गेले मात्र कोर्टाने या नाटकाचा मार्ग मोकळा केला. हे नाटक रंगमंचावर येण्याआधी या नाटकाची जुळवाजुळव दिग्दर्शक विनय आपटे करत होते. या नाटकात नथुरामच्या भूमिकेसाठी आजचा आघाडीचा अभिनेता दिग्दर्शक ‘प्रसाद ओकची’ निवड करण्यात आली होती, मात्र शरद पोंक्षे या नाटकाच्या तालमीला पोहचले तेव्हा त्यांनादेखील नथूरामच्या भूमिकेसाठी विचारले, त्यांनी ऑडिशन दिली आणि विनय आपटेना त्यांचा ‘नथुराम’ शरद पोंक्षे यांच्यात सापडला. या नाटकाने हजारो प्रयोग केले. या नाटकासाठी अनेक दिग्गज अभिनेत्यांना विचारण्यात आले होते. नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांना विचारण्यात आले होते मात्र त्यांनी नकार दिला होता. विक्रम गोखले यांना ही भुमिका करायची इच्छा होती मात्र गोष्टी जुळून आल्या नाही.
     या नाटकाला राजकीय विरोध मोठ्या प्रमाणावर झाला मात्र प्रेक्षकांनी कायमच या नाटकाला गर्दी केली होती. हे नाटक बघून प्रेक्षक थक्क व्हायचे. खुद्द शरद पोंक्षे यांनी हा किस्सा आपल्या ‘मी आणि नथुराम’ पुस्तकात लिहला आहे. या पुस्तकात त्यांनी नाटक करताना आलेले अनेक अनुभव लिहले आहेत. ‘मी नथुराम गोडसे’ हे नाटक बंद झाल्यानंतर शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा ‘हे राम नथुराम’ हे नाटक सुरू केले होते. मूळ नाटक हे प्रदीप दळवी यांनी लिहले होते. माऊली प्रॉडक्शनने निर्मिती सांभाळली होती.