राहुल गांधींच्या भारत जोडोपूर्वी ‘या’ पाच पदयात्रांनी घडवली राजकीय क्रांती

KolhapurLive

काँग्रेसची भारत जाडो यात्रा सुरु आहे. मात्र, यापूर्वीही देशातील काही राजकीय नेत्यांनी पदयात्रा काढल्या होत्या.
    २०२४ साली भारतात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी २४ तास राजकारण करण्यास सज्ज असलेल्या भाजपाने तयारी सुरु केली आहे. तर, प्रमुख विरोधी पक्ष असेलल्या काँग्रेससमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. काँग्रेसमधील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची वाट सोडत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे संघटनेला मरगळ आली आहे. ती मरगळ झटकून येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला सज्ज व्हावे लागणार आहे.
     १९९८ आणि २००४ साली झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तर, २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान अटबिहारी वायपेयी यांना विजयाची खात्री होती. प्रसारमाध्यमांतही तशा चर्चांना उधाण आलं होते. मात्र, घडले उटलेच या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला, तर काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर, बोलताना वाजपेयी म्हणाले की, “या निवडणुकीत जिकणाऱ्यांना पराभवाची, तर हार पत्करनाऱ्यांना जिंकण्याची अपेक्षा होती.”भाजपाच्या पराभवाची कारणे कोणालाच माहिती नव्हती. मात्र, असं सांगितलं जातं, हरियाणातील सोनीपत येथे २००४ साली एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला आलेल्या एका नागरिकाने ‘भारत चमक रहा है लेकीन आम आदमी को क्या मिला?’, असा नारा दिला. हा नारा देशाच्या काना-कोपऱ्यात पोहचला आणि भाजपाला पराभव सामना करावा लागल्याचं सांगण्यात येतं.
    त्यानंतर सलग १० वर्षे काँग्रेस सत्तेत होती. मात्र, २०१४ सालापासून गेली आठ वर्षे काँग्रेसला सत्तेचा दुष्काळ पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो यात्रा’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. या यात्रेमुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये नवचैत्यनाचे वातावरण निर्माण झालं आहे. तरीही, या ‘भारत जोडो यात्रे’चा आगामी निवडणुकीत कसा प्रभाव दिसतो, हे पाहावे लागणार आहे. पण, यापूर्वी अनेक नेत्यांनी आपल्या अस्तित्वासाठी पदयात्रेचा मार्ग स्वीकारल्याचं पहायला मिळतं. त्याचं काही यात्रांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*

🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE

Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.

Admission Open for Offline & Online Batches.


👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅप करा.

📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |

📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.