राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या भाषणात गेल्या काही महिन्यांपासून फरक पडला आहे. पूर्वी फडणवीस भाषण करताना वरच्या पट्टीत बोलायचे. श्वास न घेता पल्लेदार वक्तव्य करायचे. आता मात्र, त्यात फरक पडलेला दिसत आहे. फडणवीसांमध्ये हा बदल अचानक कसा झाला? याचं अनेकांना कुतुहूल वाटत आहे. फडणवीस यांच्यात झालेला हा बदल ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांच्यामुळे झाला असं सांगितलं तर? आश्चर्य वाटेल ना? पण ते खरं आहे. नाना पाटेकर यांनी सातत्याने टोचल्यामुळे फडणवीस यांच्या वक्तृत्वात बदल घडून आला आहे. तशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी फडणवीस आणि नाना पाटेकर या दोघांनीही हा किस्सा सांगितला. तुम्ही मुख्यमंत्री झाला. भाषण करताना तुमचा स्वर फार वरचा लागायचा. ते करू नका, असं नाना पाटेकर फडणवीस यांना सांगायचे. त्यानुसार फडणवीस दुरुस्तीही करायचे.
माझा स्वर खालच्या पट्टीत आला. नाना त्याचं क्रेडिट तुम्हाला जातं. विधानसभा निवडणुकीतील प्रत्येक भाषणा नंतर नानांचा फोन यायचा. अरे बाबा किती जोराने बोलतो. जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबुल करायचो की तुम्ही माझं पुढचं भाषण ऐका, बदल जाणवेल. पण पुढच्या भाषणात मी तसंच बोलायचो. पुन्हा नानांचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं. त्याचं शंभर टक्के क्रेडिट नानांचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी हे उत्तर देताच नाना पाटेकर यांनी त्यावर कोटी केली. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजितदादांना आहे. गाण्यात लतादीदी आणि बोलण्यात अजितदादा हे कुठे श्वास घेतात हे कळतही नाही. पण तुम्ही पूर्णपणे स्वत:ला बदलून टाकलं आहे, असं नाना म्हणाले.
🤩 💯% *Job Guarantee for Campus Placement*
🏫SPaRK Computer Institute (Total It Solution) AN ISO 9001:2015 CERTIFIED INSTITUTE
Batch 2022. BE|BTECH|MTECH|BSC|MSC|BCA|MCA|DIPLOMA|DEGREE|ALL TRADE.
Admission Open for Offline & Online Batches.
👍 अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा.
📱 *संपर्क* : 9975491519 | 9767007394 |
📍 *पत्ता* : 5/328, कागवाडे मळा, डॉ. अमर कुलकर्णी हॉस्पिटल समोर , इचलकरंजी - 416115.