राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षाच्या चिन्हावरुन आणि दावेदारीवरुन वाद सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतला. या मेळाव्यामध्ये राज यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिल्याची माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी मेळाव्यानंतर दिली. राज ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकींसाठी सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा असे निर्देश दिल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना देशपांडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज आणि बाळासाहेब यांचीही तुलना
सर्व महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवण्याचे निर्देश राज ठाकरेंनी दिले. त्या कशा लढवायच्या यासंदर्भातील मार्गर्शन राज ठाकरेंनी केलं,” असं देशपांडे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. यावर हा स्वबळाचा नारा होता का? असं विचारलं असता, “सगळ्या महानगरपालिकेतील सगळ्या जागा म्हणजे अर्थ तोच झाला,” असं देशपांडे म्हणाले.
तुमची विचारसरणी सकारात्मक असणं गरजेचं आहे. सत्ता येईलच असं त्यांनी काही सांगितलं का? असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता देशपांडे यांनी असाच संदेश राज यांनी दिल्याचं म्हटलं. “राज यांनी तेच सांगितलं, ज्या पद्धतीचा एक प्रचार सुरु आहे खोटा आम्ही रडलो तर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. त्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अशी कोणतीही सहानुभूतीची लाट नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं,” असं देशपांडे म्हणाले.