ठाकरे गटातून उमेदवारीसाठी चर्चेत आलेलं नवं नाव कोणतं? या नावाच रमेश लटकेंशी काय संबंध? जाणून घ्या
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By poll Election) आता आणखी एक नाव चर्चेत आलंय. ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) एक उमेदवार हा चर्चेत आला आहे. वॉर्ड क्रमांक 81 चे माजी नगरसेवक असलेल्या संदीप नाईक (Sandeep Naik) यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत असल्याची माहिती मिळतेय. संदीप नाईक हे स्वर्गीय रमेश लटके यांची निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आता शिवसेनेकडून प्लान बी आखण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून संदीप नाईक यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असल्याचं कळतंय.
अंधेर पूर्व विधानसभा मतदारसंघात रमेश लटके याचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं होतं. या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या जागी आता पोटनिवडणूक होते आहे. या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात असं सुरुवातीला सांगण्यात आलं. पण ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन राजकारण तापल्यानं शिवसेनेनं प्लान बी देखील सज्ज ठेवलाय.