मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना ट्विटरवर शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सीआययूने एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रदीप भालेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून, भालेकरला कुरार, मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडियावरती (Social Media) अनेक नेत्यांना ट्रोल केले जाते. आपल्या विचारधारेच्या विरोधात किंवा आपल्या राजकीय पक्षाच्या विरोधातील भूमिका एखाद्या व्यक्तीने वा नेत्याने घेतल्यास त्याच्या विरोधात टीकांचा भडीमार केला जातो.
अशातच आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ट्विटरवर (Tweet) शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सीआययूने एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रदीप भालेकर या व्यक्तीला मुंबई (Mumbai) येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भालेकरला पुढील तपासासाठी हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे (Mumbai Cyber Cell) सोपवण्यात आले असून भालेकर हा मुंबई विकास आघाडी नावाच्या संघटनेचे अध्यक्ष असल्याचे तपासात समोर आलं आहे.