शिवराज विद्या संकुलामध्ये ३ मे रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

KolhapurLive
गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज येथे रविवार, दि. 3 मे 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवक व युवतींना सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर या सह गोवा येथील नामांकित डोमेस्टिक व मल्टिनॅशनल कंपन्या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान त्याचबरोबर इंजिनियअरिंग, फार्मसी या शाखेतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी अथवा बेरोजगार युवक-युवतीं या रोजगार मेळाव्यात सामील होऊ शकतात. जे उमेदवार रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी https://forms.gle/omGDZiLkk8BKS3aZ9 लिंक वर क्लिक करून आपली नोंदणी नोंदवावी.

या भव्य मेळाव्यात रसायनशास्त्र, फार्मसी, कॉम्प्यूटर सायन्स, इंजिनीअरिंग, सूक्ष्मजीवशास्त्र, आय.टी., बी.बी.ए., बी.सी.ए., यासह अन्य विविध विषयातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कँपस इंटरव्हूव्दारे संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या इच्छुकांचे मोफत रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कार्यस्थळी नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. तरी या उपविभागातील इच्छुकांनी या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे व रोजगाराची संधी प्राप्त करावी असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले आहे. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी अधिक माहितीसाठी प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.नितीन चव्हाण संपर्क 9421289704 यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.