गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील ३९ महाविद्यालयातून १९९ विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. अविष्कार संशोधन स्पर्धेतील विजेत्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ.पी.टी.गायकवाड, एन.एस.एस.विभागव विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. टी.एम.चौगले, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, डॉ.आर.एच. अतिग्रे, अन्य मान्यवरांच्या हस्ते न्यू कॉलेज कोल्हापूरला जनरल चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले तर स्पर्धेतील अन्य विजेत्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले. ‘जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन’ स्पर्धेचे समन्वयक डॉ.डी.एच. दगडे, उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे, डॉ.ए.व्ही.धुळे, डॉ.जे.बी.यादव व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या आविष्कार स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रा.किसनराव कुराडे, डॉ.पी.टी.गायकवाड, विद्यार्थी विकास विभाग एन.एस.एस.विभागाचे डॉ. टी.एम.चौगले, डॉ.आर.एच. अतिग्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ह्युमॅनिटी, लँग्वेज आणि फाईन आर्ट्स –प्रीती भिसे डी.के.ए.सी कॉलेज इचलकरंजी, श्रुती माने महावीर कॉलेज कोल्हापूर, अवंती पाटील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर,कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉ – श्रावणी गुरव न्यू.कॉलेज कोल्हापूर, रसिका गायकवाड विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, रामकृष्ण सावंत तात्यासाहेब कोरे कॉलेज वारणानगर, मुस्कान सुतार दताजीराव कदम कॉलेज इचलकरंजी, आरती नांगरे शाहू कॉलेज सरूड,प्युअर सायन्स- अनुराधा बोरनाईक देवचंद अर्जुननगर,संचिता शिरवळ के.आय.टी. कोल्हापूर, स्वरूपा व्हटकर वासंतीदेवी फार्मसी कॉलेज कोल्हापूर, दिव्या बुधवाणी भारती विद्यापीठ कोल्हापूर, प्राची मगदूम, न्यू.कॉलेज कोल्हापूर, अग्रीकल्चर अॅनिमल हजबंडरी –रितिका कोंडुसकर भारती विद्यापीठ कोल्हापूर, विग्नेश पाटील न्यू.कॉलेज कोल्हापूर, धनश्री घाटगे तात्यासाहेब कोरे कॉलेज वारणानगर, शिल्पा साळोखे सायबर कॉलेज कोल्हापूर, स्मिता दुकाने शाहू कॉलेज कोल्हापूर, इंजिनिअरिंग व टेक्नोलॉजी –दीक्षा घोसरवाडे न्यू.कॉलेज कोल्हापूर, निखील पाटील एस.जी.एम.महागाव श्रुती पाटील सी.एम.सी.व्ही.डब्लू कोल्हापूर, सिद्धार्थ पाटील के.आय.टी.कोल्हापूर, सानिया उर्फ रसिका शिंदे न्यू.कॉलेज कोल्हापूर, मेडिसीन आणि फार्मसी –श्रुती किल्लेदार भारती विद्यापीठ कोल्हापूर, स्वप्नाली माने वासंतीदेवी फार्मसी कॉलेज कोल्हापूर, आफताब गडकरी राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूर, सायली कागले भारती विद्यापीठ कोल्हापूर, विशाल जाधव यांना या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.अविनाश पाटील, डॉ. संभाजी शिंदे, डॉ.एस.व्ही.चव्हाण, डॉ.आर.एन.नाईक, डॉ.एम.टी.घोपणे, डॉ.डी.एस.भांगे, डॉ.जिनी एस.देशमाने, डॉ.एम.एस.निंबाळकर, डॉ.एस.एस.कोलेकर, डॉ.एम.आर.आबदार, डॉ.एस.एम.भोसले, डॉ.आर.जी.देसावळे, डॉ.पी.के.गायकवाड, डॉ.रोहित शहा, डॉ.संदीप गारे, डॉ.सोमनाथ भिंगे आदींनी केले. स्पर्धा समन्वयक प्रा.सुशांत पांगम, गौरव पाटील, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे, प्रा.किशोर आदाटे,डॉ.महेश चौगुले, डॉ.एन.बी.एकीले, प्रा.श्रीधर सावेकर, प्रा.तंझीला काझी, डॉ.व्ही.एस.सावंत, डॉ.राहुल मगदूम, डॉ.विद्या देशमुख, प्रा.पी.आर.डोंगरे, प्रा.निकिता नाईक, प्रा.सचिन कांबळे, प्रा.रवी खोत, रजिष्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांच्यासह अन्य प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अशोक मोरमारे, डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार प्रा.गौरव पाटील यांनी मानले.