गडहिंग्लजः येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी कौशल्या अस्वले यांचा 'भनस्पर्शी' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या काव्यसंग्रहातील सौंदर्य, लिखाणातील सहजता, जीवनानुभव यावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जे ना देखे रवी, ते देखे कवी असे म्हटले जाते याचे प्रत्यंतर या कविता वाचत असताना सदोदित होत असते असे मत शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे, यांनी मांडले. या कार्यक्रमप्रसंगी सौ. गंधालीदेवी संग्रामसिंह कुपेकर, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, हडलगेचे सरपंच श्री हणमंत पाटील, कालकुंद्रीचे साहित्यिक के. जे. पाटील, प्रा. विश्वजीत कुराडे, प्राचार्य डॉ. राहुल जाधव य फार्मसी चे सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, अस्वले परिवार हडलगे उपस्थित होते