कोल्हापूर : करवीर साहित्य परिषद व संत गाडगेबाबा अध्यासन कोल्हापूर यांच्या वतीने डॉ. सौ. जयश्री संतोष तेली यांच्या स्त्री विकासाच्या दिशा व दशा* या पुस्तकास उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाले. या वेळी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. करवीर साहित्य परिषद आणि संत गाडगे महाराज अध्यासन, कोल्हापूर यांच्यातर्फे साहित्य पुरस्कार वितरण समारंभ सन 2023,शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष करवीर भूषण ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे,प्रमुख पाहुणे मा. इंद्रजीत देशमुख साहेब,प्रमुख उपस्थिती रयत शिक्षण संस्थेचे मा.डाॅ. एम.बी शेख, भारती विद्यापीठाचे कुलपती मा.डाॅ. शिवाजीराव कदम,प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब चकोते,संस्था अध्यक्ष श्री. एस. एन. पाटील, कोषाध्यक्ष श्री. एम.डी. देसाई ,अध्यक्षा प्रा. डॉ. सौ. एस. बी. बिडकर मॅडम उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला.