गडहिंग्लज : येथील शिवराज विद्या संकुलामार्फत थोर समाजसेवक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनी (दि.२ जानेवारी २०२४) देण्यात येणारा 'कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज यांना तर कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार' प्रयोगशाळा परिचर श्री रामचंद्र वडर यांना जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार दै. 'लोकमत'चे संपादक डॉ. वसंत भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे हे भूषविणार असून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी दिली.