गडहिंग्लज : मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी जलत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या प्रकृतीस स्वास्थ लाभावे व मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर होवो. यासाठी गडहिंग्लज येथील साखळी उपोषणात सकल मराठा समाजाने महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन केले. समन्वयक नागेश चौगुले, किरण कदम, आप्पा शिवणे, प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी सहभाग घेतला.
गडहिंग्लज तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत साखळी उपोषणात आज कडगावकर, हनिमनाळकर, नांगनूरकर, बडयाचीवाडीकर, बटकणंगलेकर यांनी सक्रीय सहभाग घेतला. इंडीयन मेडीकल असोशिएशन, सखी महिला मंच, कडगांव, महालक्ष्मी यात्रा कमिटी नांगनूर यांनी पाठींब्याची पत्रे समन्वयकांच्याकडे सुपूर्त केली. डॉ. नागेश पट्टणशेट्टी, डॉ. चंद्रशेखर देसाई, नेताजी पाटील, आजीत जामदार, प्रियंका देसाई, विश्वास खोत, अरूणा शिंदे, उज्वला दळवी इ. ची मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणास पाठींबा देणारी भाषणे झाली. या प्रसंगी रमेश रिंगणे, विठ्ठल भमानगोळ, अर्जुन भोईटे, चंद्रकांत सावंत, रावसाहेब कुरबेट्टी, जयसिंग पोवार, बाबासाहेब देसाई, युवराज बरगे, संजय पाटील, शिवाजी कुराडे, प्रतिक क्षिरसागर, विकास मोकाशी, धोंडीबा कुंभार, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, किरण शिंदे, विलास पाटील, प्रमोद जाधव, शिवाजी मटकर, हरीबा रेडेकर, प्रविण पाटील, दिपक मटकर, अशोक शिंदे, नरेंद्र भद्रापूरे, गुंडू पाटील, सदानंद पाटील, बंटी पाटील, नुर मुहमद बस्ताडे, छाया सावर्डेकर, विठ्ठल पाटील, ऋतुराज रणवरे, दिलीप पाटील, अशोक शेवाळे, आनंदा देसाई, फत्तेसिंह नलवडे, मोहन चव्हाण, राजेंद्र चव्हाण, सुरेश नलवडे, प्रकाश देसाई, सहदेव कोकाटे, भारत मांगले, संजय कुरळे, वैभव माने, सागर कदम, अमोल कुरळे, मिलिंद नलवडे, भारत मांगले, ओंकार नलवडे, अनिल महाडिक, दत्तात्रय पोवार, प्रशांत महाडीक, विक्रम शिंदे, सिध्दनाथ लोखंडे, भिमराव राजाराम, रमेश गिरी, संदीप पाटील, वैशाली गिरी, निवृत्ती राजाराम, माया पाटील, शितल पाटील, सुमन सावंत, शारदा आजळकर, उर्मिला कदम, छाया वडगावे, मंजुषा कदम, स्नेहा भुकेले, राणी चौगुले, उपस्थित होते.