एएफसी च्या ग्रासरूट पॅनल मीटींग व कॉन्फरन्समध्ये अंजू तुरंबेकर

KolhapurLive


दि. 21 नोव्हेंबर 2023 रोजी एएफसीची ४ थी ग्रासरूट पॅनल मीटिंग मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे पार पडली. यावेळी आशियातील ग्रासरूट फुटबॉलचा दर्जा उंचविण्याची वचनबध्दना अधोरेखित करण्यात आली. 

एएफसी तांत्रिक संचालक अँडी रॉक्सबर्ग याच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी एएफसी चे पदाधिकारी आणि संपूर्ण आशियामधून 12 पॅनेल सदस्य उपस्थित होते यामध्ये आपली कोल्हापुरची कन्या अंजू तुरंबेकर यांनी आपली भूमिका बजावली. यावेळी तज्ञांद्वारे संपूर्ण वर्षाचा अहवाल घेऊन आशियातील सर्व देशांच्या फुटबॉल विकास प्रोग्रामचा दर्जा ठरविण्यात आला. ही बैठक आशियातील ग्रासरूट फुटबॉल तज्ञांसाठी कल्पनांची देवाणघेवाण करण्याची आणि रणनितींवर चर्चा करण्याची उत्कृष्ट संधी होती. या सर्व गोष्टींचा आशियातील फुटबॉल विकासासाठी अधिकाधिक उपयोग कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहू असे अंजू तुरंबेकर यांनी सांगितले.

यानंतर 21 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान एएफसी ची कॉन्फरन्स पार पडली. यावेळी बेस्ट ग्रासरूट लीडर म्हणून जपानच्या मासाकात्सू सेतोवाकी, बेस्ट ग्रासरूट प्रोजेक्ट म्हणून भारताच्या अनंतपुर स्पोर्टस् अकॅडमी तर बेस्ट ग्रासरूट क्लब म्हणून जपानच्या कासुगा इगल्स गौरविण्यात आले.