शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यावतीने 'नॅक' चा 'ए' दर्जा प्राप्त केल्याबद्दल शिवराज महाविद्यालयाचा गौरव

KolhapurLive

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाने 'नॅक' चा 'ए' दर्जा प्राप्त केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यावतीने आमच्या महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुंबई विद्यापीठाने कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी हा गौरव स्वीकारला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, रजिष्ट्रार डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन विभाग नियंत्रक डॉ. जाधव, वित्त विभाग प्रमुख डी. पाटील मॅडम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, शिवराज महाविद्यालयाचे 'नॅक' समन्वयक प्रा. किशोर अदाटे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. ए. जी. हारदारे आदी उपस्थित होते.

अॅथलेटिक्स स्पर्धेत सलग दहा वर्षे शिवाजी विद्यापीठाची जनरल चैंपियनशिप पटकविली आहे. नुकतेच शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या इंटरझोनल अॅथलेटिक स्पर्धेत अकराव्यांदा जनरल चॅम्पियनशिप पटकावले आहे. महाविद्यालयाने क्रीडा परंपरेची दैदिप्यमान वाटचाल आजही कायम ठेवली आहे. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने खेलो इंडिया, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू घडविलेले आहेत. मिळविणारे खेळाडू महाविद्यालयाने घडविलेले आहेत. विविध क्रीडा स्पर्धेत सर्वोकृष्ठ खेळाडू म्हणून नावलौकिक 

या शिवाय महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे खेळाडू खेळाच्या माध्यमातून मुंबई पोलीस व महाराष्ट्र पोलीस अधिकारी,मिलिटरी ऑफिसर, यांसह विविध खात्यात सध्या कार्यरत आहेत हे महाविद्यालयाला भूषणावह आहे. विविध नामांकित कंपन्याशी सामंजस्य करार करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी कार्यशाळा राबविण्यात आल्या आहेत, युवती सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. दरवर्षी कैंपस मुलाखतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये अनेक विद्यार्थी निवडीची परंपरा महाविद्यालयाने कायम राखली आहे. आजतागायत महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात उच्चपदस्थ अधिकारी, शासकीय अधिकारी, व्यावसायिक, उद्योगपती यासह अन्य क्षेत्रात चमकत आहे. यावर्षी देखील महाविद्यालयाच्या बी.सी.एस. व बी.एस्सी. कॉम्प्यूटर विभागाचे १५२ विद्यार्थी 'इन्फोसिस', 'विप्रो', 'कॅपजेमेनी', 'अॅटोस' यांसह अन्य नामांकित मल्टीनॅशनल आय.टी. कंपन्यामध्ये कैंपस इंटरव्युमधून नोकरीसाठी निवड झाली आहे.

भारत सरकारच्या महात्मा गांधी ग्रामीण शिक्षा अभियान, ग्रामीण शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय ग्रामीण शाश्चत विकास संस्थेने आपल्या महाविद्यालयास 'ए प्लस' (A+) ग्रेड मानांकन मिळाले आहे. यामध्ये 'ग्रीन कैंपस', 'वॉटर हार्वेस्टिंग', सोलर सिस्टीम' साठी 'ए प्लस' (A+) ग्रेड मिळाले आहे तर 'वेस्ट मॅनेजमेंट' साठी 'ए' (A) प्रेड प्राप्त झाले आहे. यामध्ये शिवराज महाविद्यालयाने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे पाच सेल्फ हेल्प ग्रुप (S. S H. G.) तयार करण्यात आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून पाणी, पर्यावरण, प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण, ग्रामीण मुलांचे शिक्षण व आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि वाडी-वस्त्यांची स्वच्छता यावे विविध उपक्रम राबविले आहे. हे उपक्रम राबवून महाविद्यालयाच्या सेल्फ हेल्प ग्रुपने कॉलेज कैंपस व गडहिंग्लज परिसरामध्ये पर्यावरण संवर्धन व संरक्षण मध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे महाविद्यालयास 'ए प्लस' (A+) ग्रेड मानांकन मिळाले आहे.