कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघात MIDC उभी रहावी यासाठी आग्रही आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात MIDC साठी रोहित पवार यांनी आंदोलनही केलं. भर पावसात ते आंदोलनाला बसले होते. MIDC साठी त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली आहे. MIDC आल्यास मतदारसंघात रोजगार निर्मिती होईल, असा रोहित पवार यांना विश्वास आहे. म्हणून ते MIDC साठी आग्रही आहेत.
कर्जत-जामखेडचे MIDC वरुन ग्रामस्थ देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता ज्या भागात एमआयडीसी होणार आहे, त्या पाटेगावच्या ग्रामस्थांनी एमआयडीसीला विरोध केला आहे. या एमआयडीसीच्या प्रश्नाबाबत कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत.
कुठे उभी राहणार आहे MIDC?
मात्र आता ग्रामस्थांनीच विरोध केल्याने आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. या एमआयडीसीच्या प्रश्नासाठी त्यांनी थेट मंत्रालयाच्या बाहेर उपोषणही सुरू केले होते. ज्या ठिकाणी एमआयडीसीची उभारणी होणार आहे त्या पाटेगाव परिसरामधील नागरिकांनी या एमआयडीसी उभारण्यास विरोध केला आहे.
रोहित पवार चालू अधिवेशनात MIDC साठी एक टी-शर्ट घालूनही आले होते. त्यांच्या क्रिम कलरच्या टी-शर्टची चांगलीच चर्चा झाली होती. यावर कर्जत एमआयडीसीबाबत भाष्य करण्यात आलं होतं. या टी-शर्टवर समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात MIDC असं लिहिण्यात आलं होतं, तर पाठीमागच्या बाजूला “ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया, आणि फक्त मुद्दयाचं बोलूया!”, असं लिहिण्यात आलं होतं.