उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का? शरद पवार काय म्हणाले?

KolhapurLive

महाराष्ट्रात वर्षभरात 2 राजकीय भूकपं झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत मोठा गट आपल्यासोबत नेला. शिंदेंच्या या बंडामुळे राज्यातील मविआचं सरकार गेलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारला एक वर्ष झालं तितक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी बंड पुकारलं. अजित पवार यांच्यासह अनेक नेते सत्तेत सामील झाले. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यावं अशी इच्छा बोलून दाखवली जात आहे.

मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात 6 जुलै रोजी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर पानसे शिवतिर्थावर आणि राऊत मातोश्रीवर गेले. या राऊत-पानसे भेटीमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली.

दरम्यान आता शरद पवार यांनी या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत आपलं मत मांडलं आहे. ठाकरे बंधू एकत्र यावं असं वाटतं का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर पवारांनी अवघ्या 5 शब्दात उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे दोघे एकत्र आले तर आनंद आहे”, असं उत्तर पवारांनी दिलं. पवारांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिली सभा पवारांचे निष्ठावंत राहिलेल्या छगन भुजबळ यांच्या नाशकात आहे.