“या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शरद पवार सांगत असले, तरी…”, राज ठाकरे यांचं विधान

KolhapurLive


पवार यांच्या राजीनामा नाट्यापासून राष्ट्रवादीत सुरु झालेल्या नाराजी नाट्याचा शेवट अजित पवार यांच्या बंडाने झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या ९ आमदारांवर राष्ट्रवादीकडून अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. यासह विविध घडामोडी आपण जाणून घेणार आहोत…

कोणालाही मतदारांशी काही देणं घेणं नाही. पक्षाचे कट्टर मतदार होते, याचा सर्वाना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल त्या तडजोडी करायचं हे पेव फुटलं आहे. मला वाटतं लोकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याचा गरज आहे. लवकरच मेळावा घेणार आहे. तसेच, महाराष्ट्र दौराही सुरु करणार आहे. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं शरद पवार सांगत असले तरी. दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे पाठवल्याशिवाय जाणार नाही. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीनंतर झाली. शत्रू कोण मित्र कोण कळत नाही,” अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

मध्यप्रदेशातील सरकार उलथवण्यात आलं. त्याठिकाणी जातीय प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्याचं सरकार आणलं. दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, हिमाचल आणि दक्षिणकेडील राज्यातही असे प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याचं काम करण्यात आलं आहे. जातीय विचारधाऱ्या असलेल्यांकडून देशाची कारभार पुढे नेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील लथापालथ ही करण्याबद्दलची भूमिका याच प्रवृत्तींनी घेतली. दुर्दैवाने त्याला आमच्यातील सहकारी बळी पडले. फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहिल. पण, महाराष्ट्रातील शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, उलथापालथ करणाऱ्या शक्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशा इशारा शरद पवारांनी दिला आहे.