राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनसंपर्क अभियान व विकास आढाव्याच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीची पुजा करून दर्शन घेतलं. यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी तुळजाभवानी मातेकडे देवेंद्र फडणवीस देशाचे नेतृत्त्व करो असा आशिर्वाद मागितला. यानंतर चर्चांना उधाण आले. आता यावर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोक आपआपल्या शुभेच्छा व्यक्त करतात. मी महाराष्ट्रातच आहे. मी ज्या जागेवर आहे त्या जागेवर पूर्णपणे समाधानी आहे. महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे.”
“आणखी किमान २० वर्षे मोदींनीच नेतृत्व करावे”
“आज देशात इतकं सक्षम नेतृत्व आहे की, आमचं म्हणणं आहे की, आणखी किमान २० वर्षे त्यांनीच नेतृत्व करावे,” असंही देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.