हेरे सरंजाम कॕंपचे उदया खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते उदघाटन

KolhapurLive


चंदगड : उद्या दि 16 जुन 2023 रोजी स १०.३०वा कानुर खुर्द येथे हेरे सरंजाम प्रश्नी शिबीर आयोजित केले आहे अशी माहीती भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांनी दिली कोल्हापूर लाईव्ह च्या माध्यमातून दिली.
    या कॕंप मध्ये कानुर खुर्द सज्जा मधील कानुर खुर्द, सडेगुडवळे,भोगोली,पीळणी,पुंद्रा ही गावे येतात .या कॕंपला सर्व शेतकरी बंधुनी आपले आर्ज जमा करावे असे आवाहन शिवाजीराव पाटील यांनी केले आहे.
  या कॕपला माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, तहसिलदार राजेश चव्हाण,भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, अमर पाटील ,तालुका अध्यक्ष नामदेव पाटील उपस्थित राहणार आहेत.