गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात 'जस्ट डायल' (JUST DIAL) या नामांकित कंपनीमार्फत 7 जून रोजी सकाळी ठीक (09:30 वाजता 'कैंपस इंटरव्ह्यू' चे आयोजन करण्यात आले आहे. या 'कैंपस इंटरव्ह्यू' मधून कंपनीच्या वतीने शंभर इच्छुक व होतकरू तरुणांची निवड करण्यात येणार आहे. कोणत्याही शाखेचा पदवी पूर्ण अथवा पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रासह महाविद्यालयात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख प्रा. बी. एस. पठाण 9822411431, बी.सी.ए. विभाग प्रमुख प्रा. के. एस. देसाई -9970222767, पी.आर.ओ. प्रा. विक्रम शिंदे- 9158914646 यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा.