“…म्हणून फडणवीसांनी चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपा प्रदेशाध्यक्ष केलं”; सुषमा अंधारेंचा दावा

KolhapurLive

उद्धव ठाकरे हे राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा स्वतःच्या सोयीने अर्थ काढून त्यावर चुकीचं भाष्य करीत आहेत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रिया, तसेच त्यांच्या भाषणातील मुद्दे गोळा करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहेत, असं बावनकुळे यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे आता रडोबा झाले आहेत. त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. त्यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, देशात नैतिकतेसाठी आतापर्यंत दोन नेत्यांनी राजीनामा दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आमच्या नेत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची उंची गाठली याचा आम्हाला अभिमान आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, बानकुळे साहेबांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना फडणवीसांकडून त्रास दिला जात आहे. फडणवीसांचा एक गट त्यांना सगळीकडून जेरीस आणतोय. मुळात फडणवीसांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं जेणेकरून त्यांनी काही बाबतीत निर्णय घेऊ नयेत. फडणवीस एखाद्या नेत्याला असं अध्यक्ष वगैरे करतात ते केवळ त्या नेत्याला साईडलाईन करण्यासाठीच करतात.