मुंबई : मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील यशस्वी टीम. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2013 पासून एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 16 व्या मोसमात मुंबईने आतापर्यंत 12 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये 14 पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. लखनऊ 12 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊ विरुद्ध मुंबई हे दोन्ही संघ आज आमनेसामने असणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी प्लेऑफच्या हिशोबाने महत्वाचा असा आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. या मॅचमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.