राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदार त्यांना मंत्रीपद मिळणार असा दावा करत आहे. दुसरीकडे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन करणार असल्याच्या मुद्द्यावरही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. १९ विरोधी पक्षांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.