चेन्नईसाठी आज ‘करो या मरो’, एमएस धोनीने जिंकला टॉस

KolhapurLive

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये IPL 2023 मधला 67 वा सामना खेळला जाणार आहे. डेविड वॉर्नरची टीम दिल्ली कॅपिटल्सच आयपीएलमधून आव्हान आधीच संपुष्टात आलय. विजयाने शेवट करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. CSK साठी पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची आहे. आज जिंकले, तर चेन्नईची टीम थेट प्लेऑफमध्ये दाखल होईल. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ही मॅच होईल. मागच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर विजय मिळवला होता.